मध्य रेल्वेची झिरो स्क्रॅप मिशनकडे मोठी वाटचाल; भंगार विक्रीतून २०२५-२६ मध्ये २४३ कोटींचे उत्पन्न :

मुंबई – मध्य रेल्वेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात ऑक्टोबर २०२५ पर्यंत भंगार विक्रीतून तब्बल २४३.०६ कोटी रुपयांचे उल्लेखनीय उत्पन्न मिळवले आहे. विशेष म्हणजे ऑक्टोबर २०२५ महिन्यातील ५१.८६ कोटी रुपयांचे उत्पन्न हे गेल्या तीन वर्षांतील ऑक्टोबर महिन्यातील सर्वाधिक उत्पन्न ठरले आहे.

ऑक्टोबर २०२५ मधील भंगार विक्रीतून मिळालेले हे उत्पन्न ऑक्टोबर २०२४ मधील २८.९३ कोटी रुपयांच्या तुलनेत तब्बल ७९% ने अधिक आहे. मध्य रेल्वेच्या पाचही विभागांसह विविध कार्यशाळा व फील्ड युनिट्समधून रेल, फेरस व नॉन-फेरस मटेरियल, रोलिंग स्टॉक, कोचेस व वॅगन्स आदी भंगाराची मोठ्या प्रमाणावर विक्री करण्यात आली.

ही उल्लेखनीय कामगिरी झिरो स्क्रॅप मिशन प्रति मध्य रेल्वेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची आणि भंगार व्यवस्थापनातील सुधारित कार्यक्षमतेची द्योतक आहे.

याशिवाय, मध्य रेल्वेने एकूण २२ पैकी १० कामगिरी निर्देशकांमध्ये प्रथम क्रमांक मिळवत शिल्ड स्पर्धेतही आघाडी कायम राखली आहे.