जळगाव जिल्ह्यात 1 व 2 डिसेंबरला मतदान केंद्र म्हणून वापरल्या जाणाऱ्या शाळांना सुटी जाहीर:

जळगाव – राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या नगर परिषद व नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुका 2025 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 16 नगरपरिषद व 2 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

या निवडणुकीत भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव, चोपडा, जामनेर, पाचोरा, भडगाव, धरणगाव, एरंडोल, पारोळा, फैजपूर, सावदा, रावेर, यावल, वरणगाव, नशिराबाद या १६ नगरपरिषदांसह मुक्ताईनगर व शेंदुर्णी या दोन नगरपंचायतीतील शाळांचा मतदान केंद्र म्हणून वापर केला जाणार आहे.

मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी संबंधित मतदान अधिकारी व कर्मचारी 1 डिसेंबर रोजीच मतदान केंद्रांवर दाखल होणार आहेत. त्यामुळे या सर्व शाळांना 1 आणि 2 डिसेंबर 2025 रोजी सुटी जाहीर करण्यात आली असल्याचे प्रशासनाने कळवले आहे

ही सुटी राज्य निवडणूक आयोगाच्या उपसचिव यांच्या आदेश (क्रमांक रानिआ/मनपा2008/प्र.क्र.9/का-5, दिनांक 11 नोव्हेंबर 2008) अन्वये देण्यात आली आहे. पालक व विद्यार्थ्यांनी या सुट्यांची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.