भुसावळ (प्रतिनिधी ) –
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 उत्साही आणि सर्वसमावेशक मार्गाने नागरिकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी स्वीप अंतर्गत भुसावळमध्ये व्यापक मतदार जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे या अनुषंगाने दिनांक 18 /11 /25 रोजी भुसावळतील विविध बँकांमध्ये जाऊन बँकेतील कर्मचारी आणि ग्राहक यांच्याशी सुसंवाद साधून मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली त्याचप्रमाणे ‘ चला करू मतदान ‘ ही संकल्पना राबविण्यात येत आहे .

याअंतर्गतव दिनांक 10 नोव्हेंबर पासून विविध शाळांमध्ये, महाविद्यालयात, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये जाऊन मतदानाबाबत उद्बोधन करून शंभर टक्के मतदान कसे होईल याबाबत भुसावळ शिक्षण विभाग आणि प्रांताधिकारी भुसावळ यांचा संयुक्त कार्यक्रम सुरू आहे प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर वायकोळे गटशिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी स्वीप प्राध्यापक वसंत खरे आणि राहुल पाटील असिस्टंट नोडल ऑफिसर हे संयुक्तपणे प्रयत्न करीत आहे
आज पर्यंत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नहाटा महाविद्यालय महिला महाविद्यालय कन्या विद्यालय या ठिकाणी भेटी देण्यात आल्या सु.ग.टेमानी कन्या विद्यालयात चित्रकला स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली एन. के. नारखेडे विद्यालयात शिक्षक स्पर्धकांकडून तालुकास्तरीय.मतदान जनजागृती पर रांगोळी स्पर्धा घेण्यात आली तसेच महिला बचत गट व अंगणवाडी सेविका यांच्यासोबत सुद्धा चर्चा करून मतदानाबद्दल जनजागृती कार्यक्रम सुरू आहेत
फोटो ओळ – बँक ऑफ इंडिया भुसावळ मुख्य शाखा चला करू मतदान या संकल्पने अंतर्गत स्विप टीम बँक व्यवस्थापक समस्त कर्मचारी व ग्राहकांना आवाहन करताना



