जळगाव (तुषार वाघूळदे) – सध्या फुफ्फुसांचे जुनाट आजारात वाढ होत चालली आहे.२०२६ मध्ये जगभरातील ‘सी.ओ. पी.डी ‘ चा प्रसार
वाढण्याची दाट शक्यता आहे, कारण जागतिक स्तरावर वृद्ध
लोकसंख्या वाढत आहे.. आणि COPD IPD सारख्या
आजारांना कारणीभूत घटक. (जसे की प्रदूषण आणि
तंबाखूचे सेवन) अजूनही मोठ्या प्रमाणावर आहेत.
जागतिक COPD दिन हा दरवर्षी
नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी साजरा केला जातो.त्या निमित्ताने उद्या दि.20 नोव्हेंबर रोजी रुग्णांच्या फुफ्फुसांची अत्याधुनिक कॉम्पुटराईज यंत्रणेद्वारे चाचणी करण्यात येणार आहे. २०२५ मध्येत्याची थिम “
शॉर्ट ऑफ ब्रेथ, थिंक सीओपीडी” (short of Breath,
Think (COPD) आहे.
जागतिक स्तरावर COPD ची सद्यस्थिती आणि २०२५
मधील वाढण्याची स्थिती विचारात घेता काय उपाय आणि
प्रभावी उपाय योजना यातून सुरक्षित राहण्यासाठी
राबवण्यात येवू शकतात, त्या संदर्भात माहिती देण्यासाठी
पत्र परिषदेचे आयोजन दि.१८ रोजी करण्यात आले होते.या पत्र परिषदेत डॉ.स्वप्निल चौधरी यांनी ‘फुफ्फुसाचा जुनाट आजार’ याबाबद्दल सांगितले. या आजारामुळे फुफ्फुसांमध्ये सूज आणि जळजळ होते, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो आणि हवेचा प्रवाह मर्यादित होतो…या आजाराची सविस्तर माहिती ,आजार कशामुळे होतो ? लक्षणे ,उपाय आदी माहिती सांगितली.
यात copd आजाराबाबत तपासणी शिबिराचे आयोजन
दि.२० गुरूवार रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत शाहूनगरातील रोज गार्डनजवळ,सहयोग क्रिटिकल शेजारी डॉ.स्वप्निल चौधरी यांचे हॉस्पिटलमध्ये आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मोफत तपासणी शिबिर असल्याने रुग्णांचे जवळपास दीड हजार रुपये वाचणार आहेत.डॉ.चौधरी केवळ वैद्यकीय व्यवसाय म्हणून नाही तर सामाजिक बांधिलकी सुद्धा जपली आहे.दरवर्षी सामाजिक जाणिव म्हणून आरोग्य शिबीर राबवित असतात. या संदर्भात नाव नोंदणी साठी तुषार पाटील
मो.९९७५८७७२१२ ,जावेद शेख मो.९७६३८३०८५२ यांचे
कडे नावे नोंदवावीत असे आवाहन त्यांनी या वेळी माहिती
देताना केले आहे.रुग्णांनी लाभ घ्यावा असे कळविण्यात आले आहे.
संपर्क- 9405057141



