सुनसगाव ता भुसावळ । वार्ताहर – येथून जवळच असलेल्या व सुनसगाव गृप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गोंभी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेला जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी भेट दिली. विशेष म्हणजे वर्गात जाऊन विद्यार्थ्यांप्रमाणे बाकावर बसून विद्यार्थ्यांची विचारपूस केली. गोंभी येथील स्वच्छ व सुंदर शाळा पाहून तसेच विद्यार्थ्यांचा प्रगतीचा आलेख पाहून आनंद व्यक्त केला.
प्रथम सुनसगाव येथील ग्रामपंचायत कार्यालय व आभ्यासिका येथे भेट दिली. त्यानंतर गोंभी गावात जाऊन शाळेला भेट दिली .विशेष म्हणजे यावेळी सिईओ मँडम यांनी शाळेत तयार केलेला शालेय पोषण आहार घेतला. त्यामुळे उच्च अधिकारी असूनही सर्वसामान्य व्यक्ति प्रमाणे वागणूक पाहून गोंभी गावातील पालकांनी आनंद व्यक्त केला. यावेळी भुसावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी , ग्रामविस्तार अधिकारी,ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकारी , बचत गटाचे पदाधिकारी तसेच गोंभी शाळेचे मुख्याध्यापक विजय देवरे , शिक्षिका पौर्णिमा नेमाडे तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. मुख्याध्यापक विजय देवरे यांनी शाळेची माहिती दिली.



