भुसावळातील जबरी लूटची उकल : गुन्हे शाखेसह भुसावळ तालुका पोलिसांचा सत्कार –

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळातील बांधकाम व्यावसायीक हाजी मुन्ना तेली यांच्याकडे कामाला असलेल्या कर्मचार्‍याच्या हातातून आरोपींनी 25 लाख 42 हजार रुपयांची रोकड लांबवली होती. जळगाव आर्थिक गुन्हे शाखेसह भुसावळ तालुका पोलिसांनी संयुक्त कारवाईत आरोपींना अटक करीत गुन्ह्याची उकल केल्याने मुन्ना तेली यांनी भुसावळ पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत तसेच तालुका पोलिस निरीक्षक महेश गायकवाड यांच्यासह जळगाव गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड व सहकार्‍यांचा सत्कार करण्यात आला.

पोलिस प्रशासनाबद्दल कृतज्ञता व्यक्त
हाजी मुन्ना तेली यांनी जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जळगाव गुन्हे शाखा निरीक्षक राहुल गायकवाड, भुसावळ पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत, भुसावळ तालुका पोलिस निरीक्षक महेश गायकवाड यांच्यासह गुन्ह्याच्या तपासात उत्तम कामगिरी केलेल्या सर्व पोलिसांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल तेली यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी डॉ.दीपक पाटील, माजी नगराध्यक्ष अख्तर पिंजारी, टीटू सेठ आदींची उपस्थिती होती.