भुसावळात प्रांतकार्यालया समोर टोकरे कोळी व समाजातील पोट जातीचे विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन ; मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा ;

भुसावळ ( प्रतिनिधी ) येथील टोकरे कोळी ढोर कोळी , कोळी महादेव, कोळी मल्हार या अनुसूचित जमातीना जात प्रमाणपत्र मिळावे यासह विविध मागण्यांसाठी कोळी समाज व समाजातील पोट जातीच्या वतीने ३ नोव्हेंबर पासुन भुसावळ उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे.मागण्या मान्य न झाल्यास ५ नोव्हेंबर पासुन तीव्र स्वरूपाचे आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी प्रशासनाला दिला आहे.
आंदोलनस्थळी विजय मोरे गणेश कोळी यांचेसह समाजबांधव उपोषण करीत आहेत .
भारतीय राज्यघटनेच्या अनुसूचि ३४२ अन्वये राष्ट्रपती यांच्याकडून अनुसूचित जमाती अध्यादेश १९५० मध्ये व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अध्यादेश क्रमांक १०८/१९७६ अन्वये महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या यादीत या जातीचा समावेश मान्य करण्यात आला असून अनुसूचित जमाती म्हणून नमूद केले आहेत . परंतु आपल्या कार्यक्षेत्रातील वरील जमातींना अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र मिळविताना नाहक त्रास होत आहे .म्हणून आमच्या संविधानिक हक्कासाठी आम्ही भुसावळ बोदवड व मुक्ताईनगर टोकरे कोळी अनुसूचित जमातीच्या सर्व समाजातर्फे आंदोलन करीत असुन मागण्या मान्य न झाल्यास ५ नोव्हेंबर पासुन आमरण उपोषण करणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
सदर आंदोलन नारायण कोळी मदन शिरसाठ जितेंद्र सपकाळे समिती अध्यक्ष भरत पाटील आकाश सपकाळे मोहन सोनवणे राजेश कोळी महेश कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात असुन भानुदास तायडे उत्तम कोळी रामचंद्र तायडे रवींद्र सोनवणे लक्ष्मण कोळी सुरेश कोळी दिलीप तायडे संजय तायडे नरेंद्र सपकाळे महिला समिती कविता महाले निर्मला कोळी सविता पाटील स्वाती कोळी सिमा कोळी भारती कोळी यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.