भुसावळ आयुध निर्माणीमध्ये लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

भुसावळ (प्रतिनिधी ) : आयुध निर्माणी भुसावल येथे आधुनिक भारताचे शिल्पकार आणि भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. देशाच्या एकात्मतेचे प्रतीक असलेल्या सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त सर्व कर्मचाऱ्यांनी देशभक्तीच्या भावना व्यक्त केल्या.

कार्यक्रमाची सुरुवात कार्यकारी निदेशक निरंजन लाल सर यांच्या हस्ते सरदार पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. विलास वाणी यांनी भूषविले.

युवा व्याख्याता सौ. सायली महाजन वायकोळे यांनी या प्रसंगी सरदार पटेल यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनावर भाष्य करताना सांगितले की, आजच्या पिढीने त्यांच्या कार्यातून एकतेचा आणि दृढनिश्चयाचा संदेश घ्यावा.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नितिन पाटिल यांनी कुशलतेने केले तर आभार प्रदर्शन श्री. किशोर वाढे यांनी मान्यवरांचे केले.

या कार्यक्रमाला सर्व अधिकारी, युनियन-असोसिएशनचे पदाधिकारी, कार्यसमिती सदस्य, JCM सदस्य, क्रेडिट सोसायटी संचालक मंडळ तसेच मोठ्या संख्येने कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

या प्रसंगी आयुध लेवा ग्रुप तर्फे सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी चेतन चौधरी (अध्यक्ष), अमोद भारंबे (सचिव), ज्ञानदेव सरोदे (खजिनदार) तसेच एन. डी. पाटील, प्रकाश नेमाडे, जीतू नेमाडे, विकास नेमाडे, अनिल लोखंडे, गिरीश अत्तरते, गणेश महाजन, मिलिंद ठोंबरे, जगदीश नेहते, किरण कवठे या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.