राजोरा (१/११/२०२५ )– पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून यंग इंडिया फिट इंडिया( YOUNG INDIA FIT INDIA ) या अभियानांतर्गत जिल्हा परिषद जळगाव चे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करणवाल मॅडम यांचे महत्वकांक्षी कार्यक्रम सुपोषित जळगाव अभियान ह्या कार्यक्रमाची सुरुवात दिनांक ०१/११/२०२५ शनिवार रोजी होत आहे.
सदर कार्यक्रमा चे आयोजन दर शनिवारी जिल्ह्यातील दत्तक घेतलेल्या गावात राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर सर तसेच यावल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू तडवी सर प्राथमिक आरोग्य केंद्र भालोद येथील वैद्यकीय अधिकारी डॉ प्राजक्ता चव्हाण मॅडम आणि डॉ भावेश जावळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली उपकेंद्र राजोरा अंतर्गत असलेले राजोरा या गावाची निवड सदर कार्यक्रमात अभियानात करण्यात आलेली आहे.
स्वतःला निरोगी व आरोग्यदायी ठेवण्या साठी हे उपक्रम राबविण्यात येणार असून सदर गावातील ग्रामस्थांना या कार्यक्रमात सहभाग होण्याचे आवाहन करण्यात आले होते.

दिनांक 01 नोव्हेंबर 2025 शनिवार रोजी सकाळी ठीक 10:30 वाजता सायकल रॅली ला सुरुवात करण्यात आली. सदर कार्यक्रमास किशोरवयीन मुला-मुलींनी चांगला प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे राजोरा गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सायकल रॅली चे उद्घाटन राजोरा गावाचे मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमा ला उप सरपंच मा. श्री दिनेश पाटील, ग्राम पंचायत सदस्य मा. श्री चेतन पाटील, मा. श्री मयुर महाजन पोलीस पाटील श्रीमती मुक्ता गोसावी,इत्यादी … मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्या करिता डॉ. जाकीर हुसेन पिंजारी समुदाय आरोग्य अधिकारी ,
आरोग्य सेविका श्रीमती वैशाली महाजन , आरोग्य सेवक अल्ताफ देशपांडे , आशा सेविका श्रीमती आशा पाटील, श्रीमती मनीषा महाजन श्रीमती मंगला सोनवणे, गं. भा. ज्योती ठाकरे श्रीमती हेमलता नारखेडे यांचे सहकार्य लाभले


