भुसावळ शहर कॉग्रेंसची आढावा बैठक उत्साहात संपन्न :


भुसावळ (प्रतिनिधी ) –

महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मोहम्मद मुनव्वर खान यांच्या निवासस्थानी येत्या होऊ घातलेल्या स्थानीक निवडणूकी संदर्भात तसेच भुसावळ नगरपालिकाची निवडणुकी लडवणयासाठी कॉग्रेंस पक्षातर्फे आढावा बैठक अल्पसंख्यॉक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मोहम्मद मुनव्वर खान यांच्या अध्यक्षतेखाली आज दीनांक 28रोजी मंगळवार संध्याकाळी चार वाजता पार पडली

या बैठकीत कॉग्रैस पक्ष स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याचे प्रदेश उपाध्यक्ष मोहम्मद मुनव्वर खान यांनी सांगितले तसेंच याबाबत लवकरच वरीष्ठाशी चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यात येईल असेही मुनव्वर खान यांनी यावेळी सांगितले . बैठकीस शैलेन्द्र कुमार ननंवरे,ईस्माल गवळी ,विलास खरात,तस्लीम पहेलवान ,भिमशक्तीचे जिल्हा अध्यक्ष सुनील जावरे,सागर कुरेशी,अकील शाह,संजय खडसे,माजी नगर सेवक रमजान भाई,रफीक शेख, रुपचंद गौर,आदि उपस्थित होते.

तसेच यावेळी काँग्रेस तर्फे नगराध्यक्ष पदासाठी इच्छूB उमेदवार म्हणून गायत्री भंगाळे,नंदा दीलीप सपकाळे,लतीका धनराज बावीस्कर, हे उपस्थित होते तर नगरसेवक पदासाठी इच्छूक उमेदवार म्हणून अनेक इच्छूक उमेदवार उपस्थित होते लवकरच वरीष्ठाशी चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यात येईल . कॉग्रैस पक्ष स्वबळावर लढवण्याची तयारीत आहे