शिरपूरात गॅस कटरने एटीएम फोडत 12.48 लाख लांबवले -सुरक्षा रक्षकासह सीसीटीव्ही नसल्याची बाब चोरट्यांच्या पथ्थ्यावर

शिरपूर – सुरक्षा रक्षका नसलेल्या एटीएमला हेरत चारचाकीतून आलेल्या चोरट्यांनी गॅस कटरद्वारे एटीएम फोडत तब्बल 12 लाख 48 हजारांची रोकड लांबवली. ही घटना शिरपूरातील
बाजार समितीच्या मागील परिसरात असलेले एसबीआयचे एटीएममध्ये शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

चोरट्यांनी रोखले पिस्टल
विशेष म्हणजे एटीएममध्ये चोरी होत असताना संशय आल्याने अंबिका नगरमधील काही तरुण आल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्यावर पिस्तूल रोखले त्यामुळे चोरट्यांनी घाईघाईने एटीएममधील कॅशचा एक ट्रे तेथेच सोडून वाहनातून पळ काढला

लाखोंची रोकड वाचली
सीएमएस कंपनीचे सिनियर एक्हिाक्यूटिव्ह संकेत वैद्य यांच्या फिर्यादीवरुन शिरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 25 रोजी एटीएममध्ये 20 लाख 32 हजार 400 रुपये जमा होते. यात कॅसेट दोन व तीनमधील रक्कम मोजली असता 14 लाख 83 हजार 600 रुपये मिळून आले. चोरट्यांनी एक आणि चार नंबरच्या कॅसेटमधील 12 लाख 48 हजार 800 रुपयांची रोकड चोरुन नेली.