भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त शुक्रवारी भुसावळात मोफत आरोग्य शिबीर…. 

भुसावळ (प्रतिनिधी )-

भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त जुना सातारा येथील सरदार वल्लभभाई पटेल स्मारकाजवळ शुक्रवार, दि ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी, वेळ सकाळी ८ ते ११ दरम्यान मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजन करण्यातआले आहे. शिबिराचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना. संजयभाऊ सावकारे,तसेच प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनीताई सावकारे वइतर मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

तपासणीपासून शस्त्रक्रियेपर्यंत मोफत उपचार;
शिबिरात श्री हरीमल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे  हृदयरोग, बालरोग, सांधे रोग, अस्थी रोग, त्वचारोग, स्त्री रोग, कर्करोग, मधुमेह, हर्निया, अपेंडिक्स, व्हेरीकोसिल, हायड्रोसिल, किडनी स्टोन, पित्ताशयाचे विकार, पोटाच्या विकाराचीतज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत. आरोग्य शिबिरामध्ये सर्व वयोगटातील नागरिकांसाठी महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतुन मोफत वैद्यकीय तपासणीपासून शस्त्रक्रियेपर्यंत मोफत उपचार सुविधा उपलब्ध असणार आहेत असे आयोजक प्रा. धिरज गणेश पाटील यांनी कळविले आहे.  
विविध रक्ताच्या चाचण्या मोफत:
याशिवाय दंत तपासणी, मौखिक आरोग्य तपासणी, मशीनीद्वारे डोळ्यांची संपूर्ण तपासणी, मोती बिंदू शत्रक्रिया, रक्तातील हिमोग्लोबिन, शुगर, लिव्हर, किडनी, कॅन्सर, थायरॉईड व विविध तपासणी मोफत करण्यात येणार आहे. रुग्णांनीआपले जुने रिपोर्ट सोबत आणावे व परिसरातील नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक प्रा. सीमा धीरज पाटील यांनी केले आहे.