महिलांशी अश्लील चॅटींग करीत उकळली खंडणी : शिंदखेडा तालुक्यातील आरोपीला बेड्या -अनेक महिलांची फसवणूक झाल्याची शक्यता : तक्रारदारानां पुढे येण्याचे आवाहन

दोंडाईचा – महिलांचे मोबाईलमध्ये काढलेले सेल्फी व चॅटींग तसेच केलेल्या व्हिडिओ कॉलच्या आधार ब्लॅकमेल करून तब्बल आठ लाखांची खंडणी उकळणार्‍या आरोपीला दोंडाईचा पोलिसांनी अटक केली आहे. कमलाकर नाना बागले (देगाव, ता.शिंदखेडा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
एका तक्रारदार महिलेसोबत आरोपी कमलाकरने मोबाईलवरून चॅट केली तसेच फोटो काढून व व्हिडिओ काढून सुरूवातीला विनयभंग करीत नंतर खंडणी उकळण्यास सुरुवात केली. 04 मार्च 2025 ते 22 ऑक्टोबर 2025 या कालावधीत घडलेल्या प्रकाराविषयी पीडीतेने 22 रोजी तक्रार नोंदवली. आरोपीने महिलेकडून यापूर्वी तीन लाखांची खंडणी उकळली तसेच पुन्हा पाच लाखांची खंडणी स्वीकारत महिलेला मारहाण केली व पेन ड्राईव्हमध्ये या सर्व प्रकाराचे फोटो असल्याचे सांगत ते सोशल मिडीयात व्हायरल करण्याची धमकी दिली.

आरोपीला बेड्या ; अनेकांची फसवणूक झाल्याची शक्यता
पोलिस निरीक्षक दिनेश एन. सोनवणे यांनी आरोपीला अटक केल्यानंतर त्याचा मोबाईल जप्त केला तसेच काही पीडीत महिलांचे अश्लिल फोटो व्हिडीओ चॅटच्या माध्यमातून काढून त्यांना वेळोवेळी ब्लॅकमेल केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. आरोपीने आणखी काही महिलांनी फसवले असल्याने तक्रार द्यावी व त्यांची नावे गुप्त ठेवण्यात येतील, असे आवाहन दोंडाईचा पोलिसाींन केले आहे
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिनेश एन.सोनवणे यांच्यासह अधीनस्त कर्मचार्‍यांनी केली.