भुसावळ शहरात जुगार अड्ड्यावर धाड ; सात जुगारींना रंगेहाथ पकडले . गुन्हा दाखल –

भुसावळ ( प्रतिनिधी ) –
भुसावळात शिवाजी नगर या भर वस्तीत टपरीच्या आडोशाला सात इसम त्यांचे स्वतःच्या फायद्यासाठी झन्ना – मन्ना नावाचा पत्यांचा खेळ ५२ पत्यांचा कॅटवर खेळवतांना मिळून आल्याची घटना ता. २३ रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. असून पोलीसांना सात जुगारीवर गुन्हा दाखल केला आहे .

बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल वाघ यांना गोपनीय माहिती मिळाली की, शिवाजी नगर भागात काही इसम झन्ना – मन्ना नावाचा मांग पत्यांचा खेळ ५२ पत्यांचा कॅटवर खेळ खेळत आहे.
याबाबत रात्र गस्त करणारे राजकीरण झाल्टे, पोलीसू कर्मचारी भूषण चौधरी, प्रशांत सोनार यांच्या पथकाने मिळालेल्या बातमी माहिती फोनव्दारे कळवून कारवाई करण्याचे आदेश दिले.
पथक घटनास्थळाचा लांब थांबवून लपत छपत पायी जावून भुसावळ शहरातील शिवाजी नगर भागात डी.एल. हिन्दी शाळेजवळ गेलेत्यावेळी राजू तुळशीराम केथवास (वय. ४५) योगेश लक्ष्मीनारायण मालविया (वय. ४३) रोशन राजकुमार मेहरा (वय. ५२) अजय मनोहर मेंढारे (वय. ५५) संदीप सयाजी भंगाळे, (वय. ४०) राजू उर्फ राजेंद्र पाव्हणू वाघ (वय. ५२) मिलिंद निवृत्ती शिंदे (वय. ५३) सर्व राहणार शिवाजी नगर त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या कब्जात पत्ता जुगाराचे साधने व रोख १९१० रुपये मिळून आले.
याप्रकरणी मनोज भागवत गाळफाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गु.र. न ४९० महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.