बिग बाजार परिसरात गावठी पिस्तूल आणि काडतूस बाळगणाऱ्या तरुणाला अटक


जळगाव (प्रतिनिधी): शहरातील बिग बाजार परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने विनापरवाना गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणाला जळगाव शहर पोलिसांनी रंगेहाथ पकडले. पोलिसांनी आरोपीकडून १५हजार ५०० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहर पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांना गुप्त माहिती मिळाली की बुधवार, २२ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता बिग बाजार सर्कलजवळील दोस्ती बिअर शॉपसमोर एक संशयित तरुण गावठी पिस्तूलासह दहशत माजवत आहे. त्यानुसार शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तत्काळ कारवाई केली.

या पथकात सहाय्यक फौजदार सुनिल पाटील, पोहेकॉ सतीश पाटील, उमेश भांडारकर, योगेश पाटील, दिपक शिरसाठ, नंदलाल पाटील, विरेंद्र शिंदे, भगवान पाटील, पोलीस नाईक भगवान मोरे, अमोल ठाकूर, प्रणय पवार आणि राहूल पांचाळ यांचा समावेश होता.

पोलिसांनी संशयिताला हर्षल जितेंद्र कदम (वय २८, रा. मकरा टॉवर, जळगाव) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त केले.

या प्रकरणी पोलीस नाईक अमोल अशोक ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपअधीक्षक दीपक सुरवळकर करीत आहे.