भुसावळ (प्रतिनिधी ) जय मातृभूमी प्रतिष्ठान संचलित जय मातृभूमी मंडळतर्फे यंदा दिवाळी पर्वानिमित्त “सोनसकाळ सुरांची दिवाळी पहाट” हा सुरेल आणि संस्कृतीने नटलेला सोहळा भव्य उत्साहात पार पडला.

आज पहाटे ६ वाजता जय मातृभूमी, भुसावळ येथे या सांस्कृतिक कार्यक्रमाची रंगतदार सुरुवात झाली. सुप्रसिद्ध गायक अनुराग जगताप, गायिका श्रुती जोशी आणि संयोजक तसेच गायक किरण सोहळे यांनी आपल्या मधुर आवाजाने श्रोत्यांना सुरांच्या सागरात नेले. साथसंगतीसाठी गणेश देशले आणि अन्य कलाकारांनी आपल्या उत्कृष्ट तालवादनाने कार्यक्रमात बहार आणली.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि रजनी सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी शहरातील नामांकित उद्योजक मनोज बियाणे, किरण कोलते, किशोर कोलते तसेच CRMS विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
भुसावळकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक दिवाळी पहाटेचा आनंद घेतला. जय मातृभूमी मंडळाचे अध्यक्ष किरण कोलते यांनी उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले आणि पुढील काळात अशा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार व्यक्त केला.


