रक्ताची नाती नाही परंतु मनातील नाते जुळलेल्या बेघर केंद्रातील बंधू- सोबत नारीशक्तीने भाऊबीज केली साजरी ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव तर्फे बेघर निवारा केंद्र या ठिकाणी भाऊबीज साजरी करण्यात आली. दिवाळी हा सण नात्यांचा ,आनंदाचा असून ज्यांना कुणाचा आधार नाही असे गरजू , आशाळभूत अशा बंधू-सोबत नारीशक्तीने भाऊबीज साजरी केली. भाऊबीज हा भावा बहिणीच्या प्रेमाचा सण तर आहेच पण तो मनातील भावनांचा उत्सव आहे. समाजातील गरजू अशा बेघर कुटुंबीयांसोबत भाऊबीज साजरी करत असताना नारीशक्तीने प्रेमाचा संकल्प ,विश्वासाची ग्वाही आणि कर्तव्याची शपथ व संरक्षणाची वचनबद्धता पाळलेली आहे. रक्षाबंधन आणि भाऊबीज
नारीशक्ती बेघर निवारा केंद्रातील कुटुंबीयांसोबत साजरी करते ही कौतुकास्पद बाब आहे. ज्यांना कुणाचा आधार नाही त्यांना मनाचा आधार देण्याचे काम नारीशक्तीच्या बहिणींनी केलेले असून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आज या भाऊबीजेच्या दिवशी ओसंडून वाहत होता. भाऊबीजनिमित्त ओवाळून भाऊबीजेची भेट नारीशक्तीच्या बहिणींनी भावांना देऊन एक अनोखी भाऊबीज साजरी केली. याप्रसंगी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष सौ मनीषा किशोर पाटील
ए बी पी माझा ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर नेवे, आशा मौर्य, नेहा जगताप, हर्षा गुजराती, किशोर पाटील,सेजल वनरा, शितल काटे उपस्थित होते तसेच बेघर निवारा केंद्राचे व्यवस्थापक मनोज कुलकर्णी यांनी अनमोल असे सहकार्य केले.