ब्रेकिंग न्यूज भुसावळ औष्णिक वीज निर्मिती केंद्रात बिबट्याचा संचार ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – दिपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रात आज मंगळवार दिनांक १४ रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास एनडीएम पंप हाऊस 500 MW येथे मोकाट बिबट्या फिरतांना कामगारांच्या निदर्शनास आले अचानक या भागात बिबट्याला फिरतांना बघून मात्र कामगारांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे .

दरम्यान दीपनगर प्रशासनाने याची तत्काळ दखल घेतली असून उद्या, सकाळी वनविभागाचे अधिकारी दाखल होणार असून बिबट्या चा बंदोबस्त करणार असल्याचे समजते .