भुसावळ जि.प. व पं.स. निवडणुकीचे आरक्षण जाहीर : कही खुशी, कही गमची स्थिती

भुसावळ – तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरक्षण जाहीर करण्यात आले असून, कुणासाठी आनंद तर कुणासाठी निराशा अशी कही खुश, कही गम ची परिस्थिती तालुक्यात पाहायला मिळत आहे. तहसील कार्यालय भुसावळ येथे तहसीलदार निता लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती आरक्षण प्रक्रियेचे काम पार पडले.
यावेळी भुसावळ तालुक्यातील सहा पंचायत समिती गणांचे आरक्षण निश्चित करण्यात आले असून तपशील पुढीलप्रमाणे आहे.
पंचायत समिती गण आरक्षण कुन्ह्य प्र. सर्वसाधारण (जनरल), वराडसिम नामनिर्देशित प्रवर्ग (नामाप्र) जनरल, साकेगाव सर्वसाधारण (जनरल), कंडारी अनुसूचित जाती (स्त्री), हतनूर अनुसूचित जमाती (स्त्री), तळवेल सर्वसाधारण (स्त्री).
जळगाव जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या
मार्गदर्शनाखाली काढण्यात आले. भुसावळ तालुक्यातील तीन गटांचा यात समावेश आहे. जिल्हा परिषद गट आरक्षण कंडारी गट अनुसूचित जाती राखीव, तळवेल गट अनुसूचित जाती (स्त्री) राखीव, कुन्हे पानाचे प्र.न. गट इतर मागासवर्गीय (महिला) राखीव याप्रमाणे आहे.
या आरक्षणानंतर तालुक्यातील अनेक संभाव्य उमेदवारांचे गणित बदलले असून काही ठिकाणी आनंदाचे वातावरण तर काही ठिकाणी नाराजीचा सूर उमटत आहे. अनेक इच्छुक उमेदवारांचे गट बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. समीकरणांवर या आरक्षणाचा थेट परिणाम
भुसावळ तालुक्यातील राजकीय
होणार असून, येत्या काही दिवसांत उमेदवार निवडीसाठी पक्षांतर्गत हालचालींना वेग येणार आहे. यात काही ठिकाणी पुरुष उमेदवाराने गेल्या अनेक वर्षांपासून तयारी केली होती तर तेथे महीला आरक्षण निघाले तसेच जातीय आरक्षण समीकरणे सुद्धा बदलले आहे. परंतु पंचायत समितीत सभापती पद हे हतनूर गणाकडे राहील हे निश्चीत झाले आहे यापूर्वी याच गणातून मागील निवडणूकीत वंदना उन्हाळे निवडून आल्या होत्या. परंतु यावेळेस इतर पक्षही सक्षम महिला उमेदवार शोधत असल्याने सर्वात महत्वाची लढत या ठिकाणी राहणार आहे.