सामाजिक उपक्रम नूतन फालक यांचा सन्मान;
भुसावळ प्रतिनिधी : आस बहुउद्देशीय विकास संस्था, भुसावळ आणि सप्तरंग एन्टरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हिरकणी सन्मान सोहळा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भुसावळसह तापी परिसरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या २३ महिला भगिनींना यावेळी ‘हिरकणी सन्मान’ प्रदान करून गौरविण्यात आले. महिलांच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या योगदानाला प्रोत्साहन देणारा हा सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा मा. रजनी सावकारे, बियाणी प्रोजेक्टच्या संचालिका मा. संगीताताई बियाणी, माजी नगराध्यक्ष तथा जय गणेश फाऊंडेशनचे अध्यक्ष मा. उमेश नेमाडे, नंदग्राम गोधामचे संचालक मा. अभिलाष नागला, गोल्डन अवर हॉस्पिटलचे डॉ. शांतनु कुमार साहू, सक्षम नारी फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा अर्पण हॉस्पिटलच्या डॉ. सुवर्णा गाडेकर, आर्चिस ब्युटी अकॅडमीच्या संचालिका अर्चना माळी आणि आस बहुउद्देशीय विकास संस्थेचे मा. महेंद्र पाटील यांची उपस्थिती होती. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला पुरस्कारार्थींना हिरकणी सन्मान प्रदान करण्यात आला. संगीत, शिक्षण, पोलीस दल, राजकीय व सामाजिक क्षेत्र, सौंदर्यशास्त्र, कला, योगा, विधी, उद्योग, नृत्य आणि वैद्यकीय क्षेत्रातील महिलांच्या कार्याची यावेळी दखल घेण्यात आली. या महिलांना मिळाला हिरकणी सन्मान अनिता पाटील - संगीत, प्राचार्या नीना कटलर - शिक्षण, मीनाक्षी घेटे - पोलीस दल, प्रीती पाटील - राजकीय व सामाजिक, वंदना ठोके - शिक्षण, रत्ना पाटील - ब्युटी व सौंदर्यशास्त्र, स्नेहा लढ्ढा - शिक्षण व कला, पारुल वर्मा - झुंबा व योगा, ॲड. वृषाली शिरनामे - विधी, ॲड. कल्पना टेमाणी - विधी, गायत्री कुमावत - ब्युटी व सौंदर्यशास्त्र, तन्वी सूर्यवंशी - ब्युटी व सौंदर्यशास्त्र, सुषमा भिडे - उद्योजिका, प्रियंका जाधव - नृत्य, सरोज मंत्री - शिक्षण, डॉ. गौरी खानापूरकर - वैद्यकीय, डॉ. वृषाली चौधरी - वैद्यकीय, नूतन फालक - सामाजिक, सविता माळी - सामाजिक, आरती मोरे - संगीत, डॉली टाक - शिक्षण विशेष पुरस्काराने संस्थांचाही गौरव या सोहळ्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दोन संस्थांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आर्या बहुउद्देशीय सेवा फाउंडेशन - डॉ. वंदना वाघचौरे, महिला पतंजली योग समिती, भुसावळ - महानंदा पाटील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार वाघुळदे यांनी केले, तर मयूर मोरे व आरती मोरे यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन पंकज कासार व त्यांच्या टीमने केले. महिलांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि व्यावसायिक योगदानाचा गौरव करणारा हा ‘हिरकणी सन्मान सोहळा’ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


