जळगाव, (प्रतिनिधी ) – मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण काढण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील १३ नगरपालिकांपैकी ९ नगरपालिकांमध्ये तर ४ नगरपंचातींपैकी २ ठिकाणी अशा एकूण १७ पैकी ११ ठिकाणी महिला राज राहणार आहे. त्या मुळे जिल्ह्यातीलब्रजकूय समीकरणे बदलणार हे नक्की. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव, अमळनेर, पारोळा, एरंडोल, पाचोरा, जामनेर, चोपडा, धरणगाव, यावल, रावेर, सावदा, फैजपूर या नगरपालिका आणि मुक्ताईनगर, भडगाव, नशिराबाद, शेंदुर्णी या नगरपंचायतींमध्ये निवडणुका होत असल्याने येथे नगराध्यक्षपदाचे आरक्षण काढण्यात आले. यात खालील प्रकारे आरक्षण निघाले आहे

नगरपालिका
भुसावळ- अनुसुचित जाती महिला
अमळनेर – अनुसूचित जमाती
, पारोळा- जनरल खुले
एरंडोल – अनुसूचित जमाती
पाचोरा- महिला सर्वसाधारण
जामनेर – खुला महिला
चोपडा- ओबीसी महिला
धरणगाव- महिला सर्वसाधारण
यावल- महिला सर्वसाधारण
रावेर- महिला सर्वसाधारण
सावदा- अनुसुचीत जाती महिला
फैजपूर – महिला सर्वसाधारण
नगरपंचायती
मुक्ताईनगर – महिला सर्वसाधारण
भडगाव- अनुसुचीत जमाती महिला
नशिराबाद – ओबीसी सर्वसाधारण
शेंदुर्णी – जनरल खुले
लवकरच निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असून रणधुमाळीस खऱ्या अर्थाने सुरूवात होणार असल्याचे मानले जात आहे.


