भुसावळ (प्रतिनिधी ) – आपल्या मार्गदर्शन पर भाषणामध्ये त्यांनी किशोरवयीन मुलींमधे होणारे शारीरिक बदल,आरोग्य विषयक समस्या,स्त्री शिक्षणाचे महत्त्व, ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणामधील अडीअडचणी तसेच स्त्रियांना असलेल्या अनेक प्रकारच्या संधी याविषयी संगोपांग असे मार्गदर्शन केले,

डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय. थोरगव्हाण ,तालुका रावेर येथे, सखी सावित्री समितीची बैठक दिनांक 18 सप्टेंबर 2025 गुरुवार रोजी पार पडली. विद्यालयामध्ये मुलींना आपल्या शारीरिक ,मानसिक व सामाजिक समस्या,अडीअडचणी याविषयी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने सखी सावित्री समितीची सभा आयोजित केली होती .कार्यक्रमाचे सुरुवातीला थोर समाजसेविका, महिला शिक्षणाच्या पुरस्कर्त्या, सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण व पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक डी. के. पाटील यांनी केले, याप्रसंगी मान्यवरांचे विद्यालयाच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रमुख वक्त्या म्हणून सौ.आरतीताई चौधरी प्रख्यात कौन्सिलर, समाजसेविका या होत्या, आपल्या मार्गदर्शन पर भाषणामध्ये त्यांनी किशोरवयीन मुलींमधे होणारे शारीरिक बदल,आरोग्य विषयक समस्या,स्त्री शिक्षणाचे महत्त्व, ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणामधील अडीअडचणी तसेच स्त्रियांना असलेल्या अनेक प्रकारच्या संधी याविषयी संगोपांग असे मार्गदर्शन केले,
याप्रसंगी कार्यक्रमासाठी सौ. क्षमाताई फेगडे ,संस्थेचे उपाध्यक्ष श्री. उमाकांत बाऊस्कर ,संचालक श्री नंदकुमार चौधरी, संचालक श्री चंद्रकांत चौधरी तसेच थोरगव्हाण गावचे पोलीस पाटील श्री अरविंद झोपे व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री डी के पाटील सर, शिक्षक पालक संघाच्या सदस्य सौ सरलाताई पाटील, तसेच सौ.प्रतिभा बाऊस्कर, सखी सावित्री समितीच्या सदस्य सौ जे.पी. चौधरी मॅडम यांनी सूत्रसंचालन केले .ज्येष्ठ शिक्षक श्री टी.पी. घुले सर,श्री वाय.जे.कुरकुरे सर ,सौ महेश्वरी मॅडम यांनी कार्यक्रमासाठी आभार प्रदर्शन केले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यालयातील पाचवी ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी या उपस्थित होत्या या कार्यक्रमामुळे निश्चितच मुलींमध्ये शिक्षण विषयक आपला दृष्टिकोन बदलेल व आपण केवळ शिक्षणामुळेच पाहिजे ते अपेक्षित ध्येय गाठू शकतो असा आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होणार आहे.


