भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ कला, विज्ञान आणि पू.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात वाणिज्य व व्यवस्थापन संशोधन केन्द्रा अंतर्गत “एक दिवसीय वाणिज्य व व्यवस्थापन विषयातील बदलता प्रवाह” या विषयावर बहुशाखीय राष्ट्रीय परिषद दिनांक 17/9/2025 रोजी आयोजित करण्यात आली. या परिषदेचे उद्घाटन सकाळी 10:00 वाजता डॉ. व्ही.एल.माहेश्वरी (कुलगुरू, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव) यांच्या हस्ते करण्यात आले. या परिषदेचे अध्ययक्षीय स्थान ताप्ती एज्युकेशन सोसायटी, भुसावळ चे अध्यक्ष, डॉ.मोहन भाऊ फालक यांनी भूषविले

. या परिषदेत उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी डों. विनोद पाटील (प्रबंधक, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव) तसेच महेश भाऊ फालक(चेअरमन, ताप्ती एज्युकेशन सोसायटी, भुसावळ) मा. विष्णू भाऊ चौधरी (सेक्रेटरी, ताप्ती एज्युकेशन सोसायटी, भुसावळ) संजय कुमारजी नाहाटा (खजिनदार, ताप्ती एज्युकेशन सोसायटी, भुसावळ) महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ.बीएच ब-हाटे, मा. डॉ. अरविंद चौधरी (प्राचार्य, बोदवड महाविद्यालय) महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. जी. आर. वाणी व प्रा. डॉ. डी.एन. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. वाय.एम.पाटील तसेच वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. ममताबेन पाटील, प्रा.डॉ. रश्मी शर्मा (समन्वयक,संशोधन केंद्र, परिषद संयोजक), प्रा. स्मिता बेंडाळे (परिषदेचे आयोजक सचिव), परिषद समन्वयक प्रा. डॉ.प्रफुल्ल ईगोले, डॉ. उमेश फेगडे, डॉ. स्वाती फालक व डॉ. सपना जंगले उपस्थित होते. या कार्यक्रमात विविध राज्यातून व महाविद्यालयातून बहूसंख्य प्राध्यापक वृंद, संशोधक, विद्यार्थी यांची उपस्थिती लाभली.
या उद्घाटन प्रसंगी आदरणीय कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांनी वाणिज्य व व्यवस्थापन शाखेच्या संशोधकांना व विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची व व्यवस्थापनाची आर्थिक विकासात भूमिका, नवीन उद्योजकांना उपलब्ध संधी, संशोधनाचे व व्यवस्थापनाचे कृत्रिम तंत्रज्ञानात महत्व, संशोधनासाठी आवश्यक कौशल्य, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेच्या बदलत्या प्रवाहाचे, उद्योगांच्या भरभराटीसाठी उल्लेखनीय योगदान इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले व संशोधक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
तसेच डॉ. विनोद पाटील( प्रबंधक, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव) यांनी आपल्या मार्गदर्शनात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात वाणिज्य व व्यवस्थापन या बहुशाखीय शाखेचे योगदान या विषयावर मार्गदर्शन मार्गदर्शन केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. ब-हाटे यांनी सदर बहुशाखीय परिषदेचे उद्दिष्टे व महत्व संगितले. व महाविद्यालयातील विविध शाखांना अशा प्रकारच्या बहुशाखीय परिषदेचे आयोजन करण्याचे आव्हान केले. तसेच ताप्ती एज्युकेशन सोसायटी भुसावळ संस्थेचे व परिषदेचे अध्यक्ष डॉ. मोहन भाऊ फालक यांनी परिषदेतील सहभागी प्राध्यापकांना व संशोधक विद्यार्थ्यांना
शुभेच्छा दिल्या तसेच या उद्घाटन कार्यक्रमात डॉ. अरविंद चौधरी डॉ. मीनाक्षी वायकोळे व डॉ रश्मी शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली १६ पीएच.डी. प्राप्त झालेल्या प्राध्यापक व संशोधकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. रश्मी शर्मा (समन्वयक) यांनी केले यामध्ये त्यांनी वाणिज्य व व्यवस्थापन संशोधन केंद्राद्वारे नियमित वेगवेगळ्या विषयांवर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले जाते.तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सोनिया टेकवाणी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. स्मिता बेंडाळे यांनी केले तसेच प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. सपना जंगले यांनी करून दिला.
या परिषदेचे आयोजन दोन सत्रात करण्यात आले. प्रथम सत्रात मार्गदर्शक डॉ. कुलदीप शर्मा यांनी वाणिज्य व व्यवस्थापनात बदलते प्रवाह यासाठीचे संबंधित घटक, वाणिज्य व्यवस्थापन शाखेचा इतर शाखेसाठी येणारा संबंध इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले. दिव्तीय सत्रात सहभागी प्राध्यापकांनी व संशोधकांनी आपले संशोधन लेख सादरीकरण केले. या परिषदेत एकूण ५५ प्राध्यापकांनी व संशोधक विद्यार्थ्यांनी विविध विषयावर संशोधन लेख सादर केले. तर एकूण २५० प्राध्यापकांनी व संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
या परिषदेच्या समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. अरविंद चौधरी (बोदवड महाविद्यालय) उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सध्याच्या काळात संशोधनाचे महत्व समजावून संशोधनातून सत्य समोर आले पाहिजे, या करीता संशोधकाने संशोधनाला गंभीरतेन घेणे आवश्यक आहे. तसेच समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. बी.एच. ब-हाटे यांनी अध्यक्षीय समारोपात सहभागी प्राध्यापक व संशोधकाचे कौतूक करून भावी काळातील निर्माण होणा-या संशोधनातील संधी व आव्हाने या कडे त्यांनी लक्ष वेधले. या समारोप कार्यक्रमात उत्कृष्ट सहभाग व संशोधन लेख सादरीकरणासाठी वाणिज्य व व्यवस्थापनशाखेतून प्रा. डॉक्टर राहुल राठोड प्रथम, प्रा.भाग्यश्री चौधरी द्वितीय , प्रा. सुचिता कुक्रेती व प्रा. मोनाली बतीसे तृतीय तसेच विज्ञान शाखेतून डॉ. विद्या पाटील प्रथम आणि कला शाखेतून प्रा. दीपक शिरसाट प्रथम, प्रा. स्मिता चौधरी द्वितीय व प्रा. योगिता भंगाळे तृतीय यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या परिषदेच्या यशस्वीतेसाठी प्रा.हर्षल पाटील, डॉ. आशिष चौधरी , श्री मुकेश फिरके , प्रा. डॉ. के. पी. पाटील , प्रा. स्वाती शेळके, प्रा. भूषण चौधरी, प्रा. खिलेश पाटील, प्रा.एकता बजाज, प्रा. नंदिनी दायमा, प्रा.प्रियंका खडसे, प्रा.वैशाली पाटील, प्रा. पूजा भंडारी, प्रा.ललिता पाटील व श्री. बापू वारके यांनी परिश्रम घेतले. तसेच सर्व सल्लागार समिती सदस्य यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो कॅप्शन – भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालयात झालेल्या कार्यशाळेत संशोधन पुस्तिकेचे प्रकाशन करताना कुलगुरू व्ही.एल.माहेश्वरी सोबत कुलसचिव विनोद पाटील तर डावीकडून डॉ.रश्मी शर्मा,प्राचार्य डॉ.बि.एच.बऱ्हाटे, संजयकुमार नाहाटा,विष्णू चौधरी,मोहन फालक,महेश फालक,प्राचार्य अरविंद चौधरी आदी.


