त्वरित रेशनकार्ड मिळावे -भुसावळात संविधान नगर मधील रहिवाश्यांची मागणी ; तहसीलदार यांना निवेदन सादर ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळातील संविधान नगर मधील रहिवाश्यांना त्वरित रेशनकार्ड मिळावे या मागणीसाठी तहसीलदार नीता लबडे यांना बुधवार दिनांक २० रोजी निवेदन देण्यात आले आहे .
निवेदनात नमूद आहे की , सर्व संविधान नगर मधील रहिवाशी गेल्या ७ ते ८ वर्षापासून संविधान नगर मध्ये राहत आहे ,परंतु या सर्वां जवळ ह्या भागात रहिवास पुरावा म्हणून रेशन कार्ड नाहीत या सर्व रहिवासी यांना रेशनकार्डची नितांत आवश्यकता असल्याने त्वरित सर्व रहिवासी यांना रेशनकार्ड मिळावे अशी मागणी करण्यात आली असून याबाबत तहसीलदार नीता लबडे यांना निवेदन देण्यात आले आहे .

दिनांक १८ ऑगस्ट रोजी मंत्री संजय सावकारे व जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सोबत नुकतीच बैठक झाली आणि या बैठकीमध्ये येथील रहिवासी आता ज्या घरामध्ये राहत आहे ती घरी ४५ दिवसाच्या आत त्यांच्या नावावर करून देण्याचे मा जिल्हाधिकारी व मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत मान्य केले आहे . त्यामुळे रेशन कार्डची नितांत आवश्यकता आहे तरी या रहिवाशी यांना ते तत्काळ मिळण्यात यावे अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी दीपक धांडे, यांचेसह उपस्थित रहिवासी यांनी केली आहे .

निवेदन देते समयी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी दीपक धांडे, यांचेसह सपना तायडे, अक्का ताई,पूजा जाधव,वंदना खंडारे,दीपाली फुलपगारे, मेघा इंगळे,नेहा करडे,किरण पाचेरवाल,सीमा घरी,रजनी नेवे,सुरेखा सोनवणे,आरती बाविस्कर,अनिता पवार, व इतर रहिवासी उपस्थित होते .