भुसावळ (प्रतिनिधी) : प्रेमविवाह असलेल्या विरोधातून वरणगाव येथील सिद्धेश्वर नगरात एका तरुणावर लोखंडी रॉड व धारदार चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना सोमवार ( ता.१२ ) रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. यावरणगाव येथे प्रेमविवाहाच्या रागातून तरुणावर जीवघेणा हल्ला; ३ जणांना अटक, ५ संशयीत फरार
प्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी ३ संशयीतांना अटक केली आहेत, तर ५ जण अद्याप फरार आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, सिद्धेश्वर नगर येथील रहिवासी गोपाळ संजय माळी (वय २४) याने दोन वर्षांपूर्वी शुभांगी नावाच्या तरुणी सोबत प्रेमविवाह केला होता. या विवाहाला शुभांगीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. सोमवार ( ता.१२ ) रात्री गोपाळ माळी हे आपल्या मित्रांसोबत बाहेर असताना, पत्नी शुभांगी हिने फोन करून सांगीतले की तूमचा भाऊ कृष्णा संजय माळी याला मारहाण करण्यासाठी माझे नातेवाईक आल्याचे सांगितले.
गोपाळ व त्याचे मित्र तात्काळ घरी पोहोचले असता, शुभांगीचा मामा सोपान धनगर, भाऊ पवन धनगर आणि इतर नातेवाईक घरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर कृष्णाशी भांडण करत होते.
भांडण सुरू असताना, सोपान धनगर याने कृष्णाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला. त्यानंतर पवन धनगर याने खिशातून धारदार चाकू काढून कृष्णाच्या गळ्याच्या दिशेने वार केला. कृष्णाने वार चुकवल्याने चाकू त्याच्या चेहऱ्यावर लागून तो गंभीर जखमी झाला. धीरज धनगर, सागर धनगर, मयुर धनगर व निलेश लाखुंडे यांनीही कृष्णाला चापटबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.भांडण सोडवण्या साठी आलेल्या शुभांगीला तिची आई मिराबाई धनगर व शेजारील निर्मलाबाई धनगर यांनी मारहाण केली, तसेच मित्र हर्षल राजपूत हादेखील या घटनेत जखमी झाला.
पोलिस येत असल्याचे समजताच सर्व संशयीत तिथून पळून गेले. गंभीर जखमी कृष्णा माळी याच्यावर ग्रामीण रुग्णालय वरणगाव येथे प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारा साठी जिल्हा शासकीय रुग्णालय जळगाव येथे दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी गोपाळ माळी यांच्या फिर्यादी वरून वरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्परता दाखवत मंगळवार ( ता. १३ दुपारी १२:३० वाजे नंतर अटक सत्र सुरू केले त्यात सुदर्शन उर्फ पवन संजय बोरसे उर्फ धनगर (वय २३), सागर बापु धनगर (वय २६) आणि धीरज संजय बोरसे उर्फ धनगर (वय १८) यांना अटक केली आहे. तर सोपान पंडीत धनगर, निर्मलाबाई बापु धनगर, मिराबाई संजय धनगर, मयुर भागवत धनगर आणि निलेश राखूंडे हे ५ संशयीत आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.