भुसावळ (प्रतिनिधी ) –
इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी ने मुंबई येथील श्री नितीन पाटील यांच्या उत्तुंग भरारी फाउंडेशन व मातानंद वेल्फेअर फाउंडेशन यांच्या सौजन्याने एक 55 इंची एलइडी टीव्ही मोहराळे आश्रमशाळेत भेट दिला. याप्रसंगी श्री नितीन पाटील यांनी इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना ‘ यशस्वी जीवनाचा मूलमंत्र’ या विषयावर मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा याचा लाभ घेतला.
या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सोनुभाऊ मांडे यांनी अशी भावना व्यक्त केली की या टीव्ही भेट दिल्यामुळे आमच्या शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींना रात्रीच्या वेळेस राष्ट्रभक्तीपर चित्रपटाबरोबर, प्रेरणादायी शॉर्ट फिल्म व जीवन चरित्र सुद्धा दाखवता येणार आहे,त्याच बरोबर प्रसिद्ध व्यक्तींची व्याख्याने युट्युब वर दाखवता येतील. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात निश्चितच भर पडणार आहे. म्हणून मी इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी व उत्तुंग भरारी फाउंडेशन यांना मनापासून धन्यवाद देतो.

याप्रसंगी व्यासपीठावर इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीच्या अध्यक्षा सीमा सोनार व प्रकल्प प्रमुख अनिता महाजन तसेच उत्तुंग भरारी फाउंडेशनचे श्री नितीन पाटील संस्थेचे अध्यक्ष सोनुभाऊ मांडे व शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनिता पाचपांडे, रेवती मांडे,हेमलता सोनार, कविता पाचपांडे, आदिती भडंग, आरती पाटील, विनिता नेवे, रणजीतकौर थेटी यांनी परिश्रम घेतले.



