गोविंदा रे गोपाला ! भुसावळातील एन.के.नारखेडेत विद्यार्थ्यांनी फोडली दहीहंडी ;

भुसावळ (प्रतिनिधी) : गोविंदा रे गोपालाच्या गजरात शहरातील शारदा नगरातील एन.के.नारखेडे इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये शनिवार, 16 रोजी दहीहंडी अर्थात गोपाळकाला उत्सव साजरा करण्यात आला. गाण्याच्या तालावर विद्यार्थिनींनी थिरकत दुसर्‍या-तिसर्‍या प्रयत्नात तीन थर लावून दहिहंडी फोडली.
अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव पी.व्ही. पाटील, संस्थेचे ऑनररी जॉईट सेंक्रेटरी प्रमोद नेमाडे, सभासद मविकास पाचपांडे, शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना कोल्हे, पर्यवेक्षिका राखी बढे उपस्थित होत्या.

सर्व मान्यवरांच्या हस्ते मार्ल्यापण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी विद्यार्थिनींनी दहीहहंडी फोडली व विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. मान्यवरांनी दहिहंडी फोडणार्‍या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना श्रीकृष्ण जीवनचरीत्राविषयी माहिती सांगितली. जन्माष्टमीच्या दुसर्‍या दिवशी साजरा होणारा दहीहंडी उत्सव भगवान श्रीकृष्णाच्या बालपणीच्या खोडकर आणि गोड आठवणींशी घट्ट जोडलेला आहे. लहानपणी कान्हा आपल्या मित्रांसोबत माखन-दही मिळवण्यासाठी मानवी मनोरे रचतात, त्याच आठवणी आजच्या दहीहंडी सोहळ्यात जिवंत झाल्या. दहीहंडीला गोपाळकाला असेही म्हणतात आणि हा उत्सव दरवर्षी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाच्या नवव्या दिवशी साजरा केला जातो.

विद्यार्थ्यांना शाळेतील धनश्री महाजन, रुही बासीत, तनुजा चौधरी, किर्ती वाघोदे, नम्रता गुरव या शिक्षकांचे मार्गदर्शान लाभले. शाळेतील सर्व शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.