भुसावळ ( प्रतिनिधी ) – येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दि १३ रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध वेशभूषा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी शाळेचे विद्यार्थी राष्ट्रीय नेत्यांच्या वेशभूषेत येऊन त्यांनी मार्गदर्शनही केले.प्रसंगी भारत माता ,चाचा नेहरू,सुभाष चंद्र बोस, भगतसिंग ,राणी लक्ष्मीबाई ,छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,सावित्रीबाई फुले, मिलीटरी मॅन अशा विविध थोर नेत्यांच्या रुपात शाळेतील इयत्ता नर्सरी,ज्युनिअर केजी व सिनियर केजी च्या १५० विद्यार्थ्यांनी वेशभूषा साकारले होते. शाळेच्या प्रिन्सिपल नीना कटलर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

फोटो कॅप्शन – भुसावळातील ताप्ती पब्लीक स्कुल मध्ये १५ ऑगस्ट निमित्त विवीध वेशभुषा कार्यक्रमात राष्ट्रीय थोर नेत्यांच्या रुपात आलेले विद्यार्थी मागे उभे प्रिंसीपल निना कटलर , स्मिता जाधव , स्मिता नन्नवरे आदी.


