भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ तालूका विधी सेवा समिती तर्फे दिनांक 13/08/2025 रोजी शारदा माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय दिपनगर येथे ॲडव्होकेट जास्वंदी भंडारी यांनी pocso Act व Anti Ragging Lawया कायद्या बाबत विद्यार्थ्याना सोदाहरणासह कायदेविषयक माहिती विशद केली या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पोस्को कायदा, रॅगिंगविरोधी कायदे आणि सामाजिक तसेच शैक्षणिक अडचणींवर मात करण्याचे उपाय समजावून सांगण्यात आले

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मा श्री जे बी पाटील , सर , होते व्यासपीठावर श्री सपकाळे सर व श्री निलेश नेहते सर उपस्थित होते .
यावेळी अॅड. जास्वंदी भंडारी यांनी “कायद्याचे ज्ञान म्हणजे स्वसंरक्षणाचे हत्यार” असे सांगत विद्यार्थ्यांनी सुद्धा आपले हक्क आणि कर्तव्य जाणून घ्यावेत, असे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता अन्याय व अत्याचार सहन करणार नाही व होऊ देणार नाही ही ठाम भूमिका घ्यावी हे सांगून विद्यार्थ्यांना जर त्रास होत असेल काही अडचणी असतील तर निमूटपणे सहन करू नका याबद्दल वेळीच तक्रार करा असेही सांगितले. प्रसंगी समांतर विधी सहाय्यक ( PLV ) तथा पत्रकार उज्वला बागुल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून विधी सेवा समिती व समितीच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली तसेच गुड टच व बॅड टच याविषयी माहिती दिली . यावेळी मुख्याध्यापक जे बी पाटील यांनी सुद्धा अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले . निलेश नेहते सर यांनी सूत्रसंचालन केले तर श्री सपकाळे सर यांनी आभार मानले यावेळी 9 वी व 10 वी मधील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मा श्री जे बी पाटील , सर , होते व्यासपीठावर श्री सपकाळे सर व श्री निलेश नेहते सर यांचेसह शिक्षक उपस्थित होते .


