शालेय शासकीय 17 वर्षाखालील फुटबॉल स्पर्धा संपन्न ; मुलींमध्ये डॉ .उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल तर मुलांमध्ये ताप्ती पब्लिक स्कूल विजयी;

भुसावळ (प्रतिनिधी ) – महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव पंचायत समिती शिक्षण विभाग व क्रीडा विभाग भुसावळ यांच्याद्वारे
17 वर्षाखालील मुले – मुली फुटबॉल स्पर्धा सेंट अलाॅयसेस हायस्कूलच्या मैदानावर पार पडल्या .

स्पर्धेचे उद्घाटन भुसावळच्या तहसीलदार नीता लबडे त्यांच्या हस्ते करण्यात आले सोबत नायब तहसीलदार श्रीमती घुले , शारीरिक शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ. प्रदीप साखरे , सेंट अलाॅयसेस शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर शीला, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक जिल्हा फुटबॉल असोसिएशन चे माजी सचिव आबिद सर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे शाल बुके देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका क्रीडा समन्वयक डॉ प्रदीप साखरे यांनी केले. उद्घाटन पर भाषणात निता लबडे यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व खेळ खेळण्यासाठी नव्हे तर आनंद मिळण्यासाठी खेळावा असे सांगितले. तर नंतर उद्घाटक नेता लबडे व सर्व मान्यवर यांच्या हस्ते मैदानावर पूजन करून बॉलला किक मारून उद्घाटन करण्यात आले. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
उपांत्य फेरीचा सामना सेंट अलायसेस स्कूल विरुद्ध बियाणी पब्लिक स्कूल यांच्यात झाला सेंट अलायसेस स्कूलने दोन शून्य ने विजय मिळविला दुसरा उपांत्य फेरीचा सामना ताप्ती पब्लिक स्कूल विरुद्ध बियाणी मिलिटरी स्कूल यांच्यात झाला ताप्ती पब्लिक स्कूल तीन शून्य ने विजयी झाले.

अंतिम सामना ताप्ती पब्लिक स्कूल विरुद्ध सेंट अलाॅयसेस स्कूल यांच्यात झाला यात ताप्ती पब्लिक व स्कूल ने पेनल्टी शुट वर पाच चार ने एका गोलने विजय मिळविला मुलींच्या सामन्यात अंतिम सामना सेंट अलायसेस स्कूल विरुद्ध डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यात झाला यात डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल एक शून्य विजय मिळविला स्पर्धा यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक सिस्टर शोभना यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे क्रीडा शिक्षक मेघाशाम शिंदे अलस्टर सिमोन्स तसेच मोजेस चार्ज डेनिस चार्ज विजय निकम मुजम्मिल खानव व महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे भुसावळ तालुक्यातील क्रीडा शिक्षक आदींनी परिश्रम घेतले .