भुसावळ ते बडनेरा खंडातील नॉन इंटरलॉकिंग कार्यामुळे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल


भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ विभागात भुसावळ ते बडनेरा खंडामध्ये शेगाव – श्रीक्षेत्र नागझरी आणि पारस दरम्यान स्वयं चलित सिग्नलिंग यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी दिनांक १४ ऑगस्ट २०२५ रोजी वाहतूक ब्लॉक घेण्यात येत आहे. या कार्या करीता खालीलप्रमाणे काही गाड्या रद्द करण्यात येणार असून, काही गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे:

गाड्यांचे रद्दीकरण दिनांक १४.०८.२०२५ रोजी
• गाडी क्रमांक ६११०१ – भुसावळ ते बडनेरा मेमू
• गाडी क्रमांक ६११०२ – बडनेरा ते भुसावळ मेमू
• गाडी क्रमांक ६१११५ – बडनेरा ते अमरावती मेमू
• गाडी क्रमांक ६१११६ – अमरावती ते बडनेरा मेमू

गाड्यांचे वेळेत बदल दिनांक १४.०८.२०२५ रोजी
• गाडी क्रमांक १११२१ – भुसावळ ते वर्धा मेमू ही गाडी भुसावळ येथून १४.२५ वाजता सुटण्याऐवजी १५.१५ वाजता सुटेल.

गाड्यांचे रेगुलेशन दिनांक १४.०८.२०२५ रोजी
• गाडी क्रमांक ११०४० गोंदिया – कोल्हापूर एक्सप्रेस विभागात २ तास रेगुलेट करण्यात येईल.
• गाडी क्रमांक १२४८५ हजूर साहिब नांदेड – श्री गंगा नगर एक्सप्रेस विभागात १ तास १० मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
• गाडी क्रमांक २०८२० ओखा – पुरी एक्सप्रेस विभागात २ तास रेगुलेट करण्यात येईल.
रेल्वे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी. हे ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. प्रवाशांना विनंती करण्यात आले आहे की, त्यामुळे होणारा गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे.