भुसावळ (प्रतिनिधी) –
भुसावळ रेल्वे विभागात हर घर तिरंगा अभियान २०२५ अंतर्गत दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. सदर रॅलीचे आयोजन विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, भुसावळ येथून भुसावळ रेल्वे स्थानकाच्या उत्तर बाजूपर्यंत करण्यात आले होते.

या रॅलीत विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) सुनील कुमार सुमन, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (तांत्रिक) एम. के. मीना तसेच विविध शाखांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि भुसावळ रेल्वे शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. रॅलीत सहभागी यांनी देशभक्तीवर घोषणा दिल्या.
रॅलीनंतर भुसावळ रेल्वे स्थानकाच्या उत्तर बाजूस एक देशभक्तिपर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात रेल्वे कर्मचाऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांचे मन जिंकले.



