भुसावळ (प्रतिनिधी) : गोकुळाष्टमीनिमित्त शहरातील विविध भागात शनिवार, 16 ऑगस्ट रोजी दहिहंडी फोडण्यात येते .या दहिहंडी उत्सवासाठी शहरातील विविध मंडळांतर्फे गोविंदासह पथक सज्ज होत आहे यंदा जवळपास १६ ठिकाणी दहीहंडी फोडण्यात येणार आहे. दहिहंडी फोडणार्या मंडळांना पोलिसांकडून परवानगी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील विविध भागात मोठ्या उत्साहात दहिहंडीचा कार्यक्रम होतो.

या भागात फुटणार दहिहंडी
शहरातील बाजारपेंठ आणि शहर पोलिस ठाण्याच्या हद्दित दहिहंडी फोडण्याचे कार्यक्रम आयोजीत केला जात असतो. संध्याकाळी सहा वाजेपासून दहिहंडी फोडण्याची परवानगी विविध मंडळांतर्फे पोलिसांकडे अर्ज करून मागितली जाते, बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दित शिवाजी नगर भागात तीन, अष्टभुजा देवी मंदीर परिसर, बद्री प्लॉट, गंगाराम प्लॉट तसेच शहर पोलिस ठाण्याच्या हद्दित शांती नगर, शारदा नगर, म्युन्सीपल पार्क परिसरात तीन,आरपीएफ बॅरेक परिसर,मरीमाता मंदीर परिसर,पाणी गेट,जुना सातारा भाग आणि कंडारी येथे तीन अश्या दहिहंडी फोडल्या जात असतात.
बद्री प्लॉट भागातील दहिहंडी आकर्षण
दहिहंडी कार्यक्रमात आयोजकांनी दहिहंडी जास्त वर बांधू नये, जर कोणी पडले तर दुखापत होते, त्यामुळे एका मर्यादेत दहिहंडी बांधावी असे आवाहन पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. शनिवारी होत असलेल्या दहिहंडी फोडण्याच्या कार्यक्रमाचे नियोजन आयोजकांतर्फे केले जात आहे. बद्री प्लॉट भागात अष्टविनायक ग्रुपतर्फे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर दहिहंडी फोडण्याचा कार्यक्रमाचे आकर्षण राहते. यंदाही हा कार्यक्रम होणार असल्याचे साईसेवक निर्मल कोठारी यांनी सांगितले.


