भुसावळ (प्रतिनिधी ) : शहरातील बडी खानका मुस्लिम कॉलनी परिसरात दि.9 ते 10 ऑगस्ट 2025 रोजी रात्री ते सकाळ दरम्यान फिर्यादी यांच्या समोरील दरवाजाला कडी लावली असताना अज्ञात चोरट्याने घराच्या मागील गॅलरीतून घरात अनधिकृतपणे प्रवेश करून चोरी केली.

चोरट्यांनी चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 1 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला असल्याची फिर्याद शेख जावेद शेख अय्युब यांनी दि.9 ऑगस्ट रोजी बाजारपेठ पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.


