भुसावळ – प्रतिनिधी – येथील विठ्ठल मंदिर वार्डातील रहिवासी गं.भा.कल्पना मधूकर नेवे (वय- ६८) यांचे मंगळवार, दि.०५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३ वाजेदरम्यान अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज बुधवार दि.०६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ०९:३० वाजता त्यांचे राहते घरून निघणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.त्या कपिल नेवे व मयुर नेवे यांच्या आई होत्या.



