अभिमानास्पद कामगिरी : रोटरी क्लब ऑफ भुसावळने पटकावली रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 ची पाच पारितोषिके ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – रोटरी क्लब ऑफ भुसावळने वर्ष 2024-25 मध्ये आपल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 कडून एकूण पाच पारितोषिके पटकावली असून ही क्लबच्या इतिहासातील एक अभिमानास्पद आणि विक्रमी कामगिरी ठरली आहे.

हा “सन्मान सोहळा” नुकताच अकोला येथे संपन्न झाला. या सोहळ्यात डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजेंद्रसिंह खुराना यांच्या हस्ते क्लबचे अध्यक्ष अनंत पाटील व सेक्रेटरी आरती चौधरी यांनी सर्व पाच पुरस्कार स्वीकारून क्लबच्या वतीने भुसावळच्या नावलौकिकात मोलाची भर घातली.

या बक्षिसांमुळे रोटरी क्लब ऑफ भुसावळने आपला सामाजिक कार्यातील अग्रणी स्थान पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. विविध सेवा प्रकल्प, समाजकल्याण उपक्रम आणि प्रभावी नेतृत्व यामुळे क्लबने हे गौरव प्राप्त केले.या यशाबद्दल शहरात सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रोटरी परिवारात या ऐतिहासिक विजयाचा आनंद व्यक्त केला आहे.
.मिळालेल्या बक्षिसांमध्ये बेस्ट पब्लिक रिलेशन , 2)बेस्ट फेलोशिप
3)बेस्ट अटेन्डन्स 4)सर्व्हिस अबाऊ सेल्फ, 5) ए. जी अँप्रिसिएशन अँवार्ड अश्या पाच बक्षिसांचा समावेश आहे .
या प्रसंगी अकोला येथे रोटरी क्लब ऑफ भुसावळचे गजानन ठाकूर, संजय चापोरकर, दयाघन राणे, मदन बोरकर, रत्नाकर क्षीरसागर, अशोक निकम, गजानन सेवलकर हजर होते.