शिक्षणाने माणसाचा सर्वांगीण विकास होतो – मनिषा पाटील ; गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप ;

*रेड स्वस्तिक सोसायटी व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेचे उल्लेखनीय कार्य* ;

जळगांव (प्रतिनिधी ) -शिक्षण हे माणसाच्या जीवनातील सर्वांत महत्त्वाचे आणि आवश्यक साधन आहे. शिक्षणामुळे केवळ ज्ञान मिळते असे नाही, तर माणसाचा सर्वांगीण विकासही होतो. शरीर, मन, बुद्धी, विचार आणि वर्तन या सर्व अंगांनी माणूस समृद्ध होतो, हेच शिक्षणाचे खरे यश असंल्याचे मत सौ मनिषा पाटील यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले

येथील रेड स्वस्तिक सोसायटी व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्यातर्फे खुबचंद सागरमल विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना गणेश वाटप करण्यात आले याप्रसंगी डॉ धनंजय बेंद्रे डॉ गणेश पाटील नारीशक्ती अध्यक्ष मनीषा पाटील नीता वानखेडकर कांचन पाटील किमया पाटील रेणुका हिंगु आशा मोर्य हर्षा गुजराती नूतन तासखेडकर वंदना वंडावरे सहाय्यक फौजदार अलका वानखेडे पोलीस हवालदार राजीव जाधव अध्यक्षस्थानी शाळेचे समन्वयक कैलास सोनार हे होते रेल्वे सल्लागार समिती सदस्य विराज कावडिया शाळेच्या मुख्याध्यापिका योगिनी बेंडाळे पर्यवेक्षक सुरेश आदिवाल मुख्याध्यापक निखिल जोगी उपस्थित होते सूत्रसंचालन लक्ष्मीकांत महाजन व आभार प्रदर्शन प्रवीण पाटील यांनी केले

यावेळी डॉ धनजंय बेन्द्रे कैलास सोनार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी कल्पना देवरे , करुणा महाले सुनीता येवले मंगला सपकाळे योगेंद्र पवार अजय पाटील पंकज सूर्यवंशी सुनील साळवे राहुल देशमुख संतोष चौधरी राजेश इंगळे संजय पाटील यांनी सहकार्य केले . गणवेश मिळाल्याने विद्यार्थांच्या चेहऱ्यावर आंनद दिसुन आला