_ वरणगावात आ चंद्रकांत पाटील यांचे हस्ते भुसावळ, साकेगाव, आचेगाव, पिंपळगाव येथील तरुणांनी शिवसेनेचा धनुष्यबाण घेतला हाती

भुसावळ (प्रतिनिधी ) – तालुक्यातील भुसावळ, साकेगाव, पिंपळगाव, आचेगाव येथील भाजप, मनसे, उबाठा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा रविवारी सायंकाळी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तर जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश झाला.
व्यासपीठावर ज्येष्ठ शिवसैनिक विलास मुळे, सय्यद जाफरअली (हिप्पी शेठ), महिला जिल्हा संघटिका नंदा निकम, युवा सेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, पवन भोळे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक विधानसभा प्रमुख संतोष माळी यांनी केले.
यावेळी जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी आपल्या भाषणात सांगितले की, शिवसेनेत रावेर लोकसभा मतदार संघातील अनेक तरुणांचा आणि इतर पक्षाचे पदाधिकारी हे शिवसेनेचे मुख्यनेते तथा उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यावर प्रेरित होऊन प्रवेश करीत असल्याचे यावेळी सांगितले.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कार्याचा झंझावात हा संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे. त्यांचे कार्य हे सर्वसामान्य जनतेसाठी नेहमी मदत करण्याची भूमिका असते. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणी प्रमाणे आम्ही देखील आज काम करीत असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगिले. ज्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला त्या सर्वांना पुढे भविष्यात काम करण्यासाठी शुभेच्छाही दिल्या.

यावेळी महिला उपजिल्हा संघटिक सविता माळी यांनी कामगार कल्याण मंडळाचे पुस्तक आणलेले आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महिलांना वाटप करण्यात आले.
शिवसेनेत यांनी केला प्रवेश
साकेगाव-
उबाठा युवा सेना उप जिल्हाप्रमुख बबलू धनगर, सोनू पाटील, पंकज कोळी, रोशन कोळी, भरत मराठे, संतोष कोळी, शुभम पाटील
पिंपळगाव –
भाजप तालुका अध्यक्ष अपंग आघाडी रामसिंग राजपूत, मंगेश पाटील, सुरेश राजपूत, दिगंबर कोळी, हरी राजपूत, तेजस चौक, भगवान राजपूत, हितेश चौके, प्रशांत पाटील
भुसावळ
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एस.पी. गट) तालुका सचिव गौरव नन्नवरे, मनसेचे नकुल महाजन, ऋतिक कुरकुरे, कुशल चौधरी, आर्यन जोशी, अनिकेत जैन
कंडारी
विक्रमसिंग राठोड, पंकज भारद्वाज, लक्ष्मण राजधर, प्रतापसिंग ठाकूर, महेंद्रसिंग ठाकूर, विजय निंबाळकर,
आचेगाव
अक्षय माळी, सागर झांबरे, महेश पाटील, कुणाल सुरवाडे, आशन 0वानखेडे, रामकृष्ण इंगळे, आकाश मोरे, नितीन सुरवाडे
कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवा सेना तालुकाप्रमुख राहुल बावणे, उप जिल्हा संघटीका सविता माळी, रूनल माळी, महिला शहरप्रमुख श्रद्धा गायकवाड, शहर संघटक दुर्गेश बेदरकर, गणेश माळी, कमलेश येवले यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार संतोष माळी यांनी मानले.


