जळगावचे सर्पमित्र मयूर वाघुळदे यांना ‘समाज रत्न’ पुरस्कार प्रदान ;


जळगाव (प्रतिनिधी ) :- येथील हजरल बिलाल बहुउद्देशीय सोसायटी जिल्हा जळगाव यांच्या माध्यमातून जळगाव येथील वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य सर्पमित्र मयूर अनिल वाघुळदे यांना समाज रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

गेल्या १0 वर्षापासून वन्यजीव रक्षक व सर्प वाचवण्यासाठी दिवसरात्र कार्य करीत आहेत. रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांना आणि वन्यजीव वाचवण्यासाठी अर्धरात्री झटणारे सर्पमित्र मयूर वाघुळदे यांच्या कामाची दखल घेऊन हजरल बिलाल बहुउद्देशीय सोसायटीने समाज रत्न पुरस्कार प्रदान केला आहे . याबद्दल सर्व स्थरातून त्यांचे कौतुक होत आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत.
जळगावमध्ये घरात वा परसबागेत, कुठेही सर्प (साप ) अथवा प्राणी पक्षी आढल्यास सर्पमित्र मयूर वाघूळदे यांच्याशी (8999441779) संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे ..