भुसावळात नाना महाराज तराणेकर यांचा १२८ वा जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ येथील अखिल भारतीय त्रिपदी परिवारातर्फे प. पू. सद्गुरू श्री.नाना महाराज तराणेकर यांचा १२८ वा जन्मोत्सव सोहळा श्रीराम मंदिर, श्रीराम नगर, भुसावळ येथे साजरा करण्यात आला.

बसकाळी भक्तीगीत,भजन गायनाने कार्यक्रमाची सुरुवात करून,पादुकांचे पाद्यपूजन, पारायण,आरती,महाप्रसाद, संध्याकाळी करुणा त्रिपदी व सुंदरकांड आस्था परिवार, भुसावळ आयोजित सुंदरकांड,अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच येथील सामाजिक व आध्यात्मिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले राधाकृष्ण प्रभातफेरी चे संस्थापक राधेश्यामभाऊ बिरदीचंदजी लाहोटी यांचा त्यांच्या वाढदिवसानिमित्त, त्रिपदी परिवारातर्फे माजी नगराध्यक्ष उमेशभाऊ नेमाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सौ.सरिताताई देशपांडे, विलास पवार, महेश पाटील, रविंद्र जोशी, .सुधीर देशपांडे आदींचे सहकार्य लाभले.सौ. कृपागौरी देशपांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.