नाहाटा महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त अभिवादन

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग, मराठी विभाग आणि करियर समुपदेशन आणि स्पर्धा परीक्षा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळक पुण्यतिथी तसेच अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे उपस्थित होते. तसेच उपप्राचार्य प्रा.डॉ. डी. एन. पाटील, प्रमुख वक्ते प्रा. डॉ. प्रफुल्ल इंगोले आणि प्रा. अक्षरा साबळे देखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. व्ही. एन. महिरे यांनी केले. प्रमुख वक्त्या प्रा.अक्षरा साबळे यांनी लोकमान्य टिळक यांचे भारतीय स्वातंत्र्य लढयातील कार्य, राष्ट्रवाद, स्वावलंबन या विषयी काही प्रसंग आपल्या मनोगतातून सांगितले. तसेच दुसरे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. प्रफुल्ल इंगोले यांनी साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवनकार्य व साहित्याविषयी माहिती दिली.

अण्णाभाऊ साठे यांचे समाजवादी विचार, कामगार चळवळीतील सहभाग त्यांच्यासाठी केलेली आंदोलने यावर प्रकाश टाकला. अण्णाभाऊ साठे यांनी रशियातील केलेल्या भाषणात ”मी ज्या भागातून आलोय तिथे साडेतीन कोटी मराठी लोक राहतात. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातून आलोय” आपले राष्ट्र, मातृप्रेम, व्यक्ती, आदर्श रशियन जनतेस सांगितले. रशियाच्या प्रवासातील असे काही प्रसंग उलगडून सांगितले. एक प्रतिभावंत साहित्यिक म्हणून त्यांची ओळख रशियातही लोकप्रिय आहे. त्याच्या अनेक साहित्यकृतीचे रशियन भाषेत भाषांतर झालेले आहे. प्रतिभावंत साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव आपल्या मनोगतात मांडाला. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे यांनी महापुरुषांच्या विचार व आदर्शाचे पालन करण्यास विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमास उपप्राचार्य व मराठी विभागप्रमुख डॉ. डी. एन. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वंदना महाजन तर आभार कु. वैशाली धनगर हिने मानले. सदर कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. एस. के राठोड, डॉ.संगीता भिरूड, डॉ.दीनानाथ पाठक, प्रा. गौतम भालेराव यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास प्रा. डॉ. पी. ए. अहिरे, डॉ. चंद्रकांत सरोदे, डॉ. मनोज पाटील, डॉ.सचिन राजपूत, डॉ. शलाका निकम आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.