पाचोरा –

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन येथे जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेडी यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांची नुकतीच नियुक्ती केली. पदभार स्वीकारताच कल्याणी वर्मा यांनी अवैध धंदे व गुन्हेगारी नियंत्रणात आणून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत .
पिंपळगाव विभागातील एका खेडेगावात देशी दारू अड्ड्यावर स्वतः जाऊन छापा टाकला. कारवाई दरम्यान देशी दारू विक्रेत्याला अटक करण्यात आली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कल्याणी वर्मा यांच्या या धडाकेबाज डॅशिंग कारवाईचे पिंपळगाव परिसरात स्वागत करण्यात येत आहे.
याही कारवाई सपोनि कल्याणी वर्मा यांचेसह तात्याबा नागरे, रवींद्र पाटील, गोविंद वाळले, अरुण राजपूत, राहुल बेहरे, नामदेव इंगळे, अमोल पाटील, सागर पाटील, किरण ब्राह्मणे, पांडुरंग गोर बंजारा, मुकेश तडवी आणि महिला पोलीस कर्मचारी योगिता चौधरी यांनी केली आहे .


