आगामी ९ वे माहुर पर्यावरण संमेलन ऑक्टोंबर २०२५ साठी शिक्षण आयुक्त गोविंदराव नांदेडे यांची उपस्थिती लाभणार ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य चे पर्यावरण संमेलन २७ व २८ ऑक्टोंबर २०२५ रोजी शक्तिपीठ माहुर या ठिकाणी होणार आहे. त्यासाठी विविध मान्यवरांना आमत्रंण देणे सुरू झाले असुन सर्वाधिक पदव्या प्राप्त मा . शिक्षण आयुक्त नांदेडे यांना निमंत्रण देण्यासाठी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष प्रमोददादा मोरे, सचिव डॉ अनिल लोखंडे, प्रसिद्धी प्रमुख .महेश पाडेकर सर ,उपाध्यक्ष श्री प्रकाश केदारी सर, उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर कऱ्हाळे सर,नांदेड जिल्हाध्यक्ष श्री सारनाथ लोणे सर,श्री. शिवाजी कपाळे सर,अन्य पर्यावरण मंडळाचे अनेक पर्यावरण प्रेमी स्नेही बंधु उपस्थित होते.

या प्रसंगी नांदेडे मंडळाची स्तुती करीत त्यांच्या,कार्याचे कौतुक केले .व कार्याला शुभेच्छा दिल्या. .