श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळ , जळगाव आयोजित राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय भव्य मेळावा परिचय फॉर्मचे प्रकाशन संपन्न ;

जळगाव (प्रतिनिधी ) – श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळ , जळगाव आयोजित राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय भव्य मेळावा रविवार दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रविवार रोजी मेळाव्याचे ठिकाण दादासाहेब श्री.शांताराम नारायण चौधरी नगर , खानदेश सेंट्रल मॉल , रेल्वे स्टेशन जवळ , जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्याचे वधू-वर व पालक परिचय फॉर्म प्रकाशन व वितरण दिनांक 13 जुलै 2025 रविवार रोजी दुपारी 4 वाजता स्टार पॅलेस हॉटेल , नवीन बस स्टॅन्ड शेजारी , जळगाव येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.

यावेळी प्रसिद्ध उद्योजक तथा समाजसेवक दादासाहेब शांताराम नारायण चौधरी , ताईसाहेब सौ. सिंधुताई शांताराम चौधरी , श्री. संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळ अध्यक्ष तसेच जळगाव जिल्हा तंटामुक्ती अध्यक्ष दादासो.मा.श्री.दत्तात्रयदादा चौधरी , मा.श्री.अनिलदादा चौधरी , जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध युवा उद्योजक तथा समाजसेवक , दानशूर व्यक्तिमत्व आमचे मार्गदर्शक दादासो. श्री.विनोदभाऊ चौधरी , जळगाव जिल्हा तंटामुक्ती सहसचिव श्री.अशोकभाऊ चौधरी , तंटामुक्तीचे जळगाव जिल्हा सदस्य तथा भुसावळ शहर तेली समाज उपाध्यक्ष सुरेशभाऊ चौधरी , तसेच जळगाव जिल्हा तंटामुक्ती समिती सदस्य श्री.दिलीपभाऊ चौधरी तसेच आमचे मोठे बंधू महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघाचे भुसावळ तालुका सचिव तथा भुसावळ शहर तेली समाज ऑडिटर श्री.सुनिलभाऊ चौधरी , सर व अन्य मान्यवर यांच्या उपस्थितीत 2025 च्या वधू-वर व पालक परिचय मेळाव्याच्या फॉर्म चे प्रकाशन करण्यात आले.