धरणगाव – शहरातील दुरावस्था व विविध समस्यां बाबत कुंभकर्णी झोप घेणाऱ्या प्रशासनाला जाग येण्यासाठी धरणगाव शहरात शिवसेना उबाठाच्यावतीने आज दिनांक १४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले .यावेळी शहरात ढोल वाजवून मिरवणूक काढण्यात येऊन निवेदन देण्यात आले .शिवसेना उपनेते तथा रावेर लोकसभा नंदुरबार जिल्ह्याचे संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांचे मार्गदर्शनाखाली ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले .

धरणगांव शहर अंर्तगत नविन पाईप लाईन मध्ये झालेल्या निकृष्ठ दर्जाचे काम व त्यामुळे उद्भलेल्या समस्याच्या बाबत धरणगांव शहरासाठी अंदाजे २७ कोटी ५० लाख रू नविन पाईप लाईन आराखडा मंजुर ईस्टीमेटसह साधारण २१-२२ मध्ये कामाला सुरूवात झाली. जवळपास पाच वर्ष होण्यात आली पण सदर काम ईस्टीमेट व नियम अटी प्रमाणे झालेले दिसत नाही. संबधीत कामामधिल निकृष्ठ दर्जा व त्रूटी च्या संदर्भात वेळोवेळी दोन ते तिन वेळेस लेखी व तोंडी तक्रार नगरपरिषद एम.जी.पी. यांना दिलेली आहे. तसे नगरपरिषद धरणगांव यांनी सुद्धा वेळो वेळी पत्र व्यवहार केलेला आहे तरी संबधीत ठेकेदार व यंत्रणा यांनी पाणी प्रश्न गार्भियांने घेतलेले दिसुन येत नाही या योजनेचे पाईप, वाल, रस्ते, मशिनरी याच्यामध्ये भष्टाचार झालेला दिसुन येतो.
तरी या योजनेची सखोल चौकशी होवून संबधीत ठेकेदार व अधिकारी यांचेवर कायदेशिर कारवाही करावी. केलेले निकृष्ठ रस्ते, व राहिलेले रस्ते, गळती वॉल, जॉईट हे ताबडतोब नविन करावेत. जो पर्यत चौकशी होत नाही तो जीन अधिकारी यांना जागे करण्यासाठी दि. १४ जुलै सकाळी ११ वा धरणगांव येथे नागरीक व शिवसेना तर्फे डोल बजाव आदोलन करण्यात आले एम.जी.पी. चे वरिष्ठ अधिकारी येत नाही आणि ठोस कार्यवाही करत नाही तो पर्यत आदोलन जारी राहिल असाही इशारा देण्यात आला आहे सदर निवेदन प्रत म. उपविभागीय अधिकारी एरंडोल विभाग एरंडोल. म. तहसिलदार सो. धरणगांव ता. धरणगांव म. मुख्याधिकारी सो. नगरपरिषद धरणगांव म. पोलीस निरिक्षक सो. कार्यालय धरणगांव .यांना रवाना करण्यात आली आहे
यावेळी शिवसेनेचे उपनेते रावेर लोकसभा नंदुरबार जिल्ह्याचे संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ,जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील,युवा सेना जिल्हाप्रमुख धरणगाव नगरीचे मा नगराध्यक्ष निलेश चौधरी ,उपजिल्हा संघटक राजेंद्र ठाकरे, उप तालुका प्रमुख कृपाराम महाजन ,शहर प्रमुख भागवत चौधरी युवा सेना शहर प्रमुख परमेश्वर महाजन,सुरेश महाजन लीलाधर पाटील,सुभाष महाजन,मा नगरसेवक उमेश महाजन,पंढरीनाथ महाजन,उपशहर प्रमुख किरण अग्निहोत्री,जिभाऊ पाटील,दिलीप महाजन, प्रसिद्धी प्रमुख गजानन महाजन,राहुल रोकडे,शरद शिरसाट,तालुका समन्वयक संतोष सोनवणे, उपशहर प्रमुख रंजीत सिंग ठाकूर, सचिन चव्हाण, उपशहर प्रमुख दिलीप महाजन, जिभाऊ पाटील, नंदू पचेरवार, सोपान माळी, संजय भटूले,आदी उपस्थित होते .



