नवी दिल्ली – प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडामधील ब्रिटिश कोलंबिया येथील सर्रे येथील कॅप्स कॅफेवर गोळीबार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंग लड्डीने गोळीबाराची जवाबदारी घेतली आहे. तो भारतासाठी मोस्ट वॉन्टेड दहशतवादी असून देशाची सुरक्षा एजन्सी असलेल्या एनआयने त्याच्यावर 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

हरजीत सिंग लड्डी हा भारतात बंदी घालण्यात आलेली दहशतवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनलचा सदस्य आहे. सुरक्षा एजन्सींच्या मते, तो जर्मनीमध्ये राहतो. कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेवर झालेल्या गोळीबारापूर्वी, विश्व हिंदू परिषदेचे नेते विकास प्रभाकर उर्फ विकास बग्गा यांच्या हत्येतही त्याचे नाव आले होते.


