भुसावळ (प्रतिनिधी ) – दिनांक 6 जुलै आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल विठ्ठल च्या जयघोषात टाळ मृदुगाच्या तालावर सकल लेवा महिला मंडळ आयोजित टाळ नृत्य सोबत रिंगण व कळस सादरीकरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . .

गेल्या महिन्याभरापासून खाचणे हॉल येथे टाळ नृत्याचा सराव सुरू होता आणि या नृत्याचे पहिले सादरीकरण सकाळी ७.३० वाजता विठ्ठल मंदिर वार्ड परिसरातील विठ्ठल मंदिरात झाले, त्यास सन्माननीय मंदिर अध्यक्ष सुहास फालक व ट्रस्टी यांनी सहकार्य केले, तसेच परिसरातील भक्तगणांनी उपस्थित राहून नृत्याचा आनंद घेतला, यानंतर लगेचच दुसरे सादरीकरण शिवमुद्रा प्रतिष्ठान येथे पार पडले, येथे शिवमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष इंगळे व सदस्यांनी कार्यक्रमास सहकार्य केले.
तदनंतर संध्याकाळी सहा वाजता तुकाराम नगर येथील विठ्ठल मंदिरात नृत्य सादरीकरणासाठी बोलावण्यात आले आणि त्यांच्या आमंत्रणाला मान देऊन तिथे विठ्ठल भक्तांच्या मोठ्या उपस्थितीत टाळ नृत्याचे सादरीकरण झाले आणि मग लगेचच म्युनिसिपल पार्क येथील दत्त मंदिर भागात चौथे नृत्य सादरीकरण पार पडले, एकंदरीतच पूर्ण दिवसभर विठ्ठल भक्तीचा पूर आलेला पाहायला मिळाला. टाळ नृत्या सोबतच नुपूर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनीनी विठ्ठलाच्या गाण्यावर सुंदर नृत्य सादरीकरण केले.

सकल लेवा महिला मंडळ आयोजित या टाळनृत्याचे उत्तम नियोजन मंडळाच्या अध्यक्षा मंगला पाटील, उपाध्यक्षा सौ प्रभावती पाटील, सचिव सौ राजश्री कोलते, खजिनदार सौ स्वाती भोळे यांनी केले तर मंडळाच्या कार्यकारणी सदस्या संध्या भोळे, मेघा कुरकुरे, मनीषा पाटील, वैशाली चौधरी, मीनाक्षी धांडे, अनिता महाजन, सोनल महाजन, यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. तसेच डॉ.मृणाल पाटील, वर्षा लोखंडे, वैशाली धांडे, सुनीता पाचपांडे, मोना भंगाळे, वैशाली पाटील यांनी प्रोत्साहन दिले.
या टाळनृत्याचे नुपूर अकॅडमीच्या संचालिका सौ चारू पाटील भालेराव यांनी उत्तम दिग्दर्शन केले , सर्व ठिकाणी चहा व फराळाचा आस्वाद सहभागी सर्व महिलांनी व उपस्थित भाविकांनी घेतला.




