तिरुपती-हिसार दरम्यान साप्ताहिक विशेष गाडी सुरु

प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीचा विचार करून तिरुपती-हिसार दरम्यान साप्ताहिक विशेष गाडी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी विवरण पुढील प्रमाणे

गाडी क्र. 07717/07718 तिरुपती- हिसार- तिरुपती (साप्ताहिक विशेष, 24 फेऱ्या):

गाडी क्र. 07717 विशेष गाडी दिनांक 09.07.2025 ते 24.09.2025 पर्यंत तिरुपती येथून दर बुधवारी 23.45 वाजता सुटेल आणि हिसार येथे शनिवारी 14.05 वाजता पोहोचेल.

गाडी क्र. 07718 विशेष गाडी 13.07.2025 ते 28.09.2025 पर्यंत हिसार येथून दर रविवारी 23.15 वाजता सुटेल आणि तिरुपती येथे बुधवारी 11.30 वाजता पोहोचेल.

थांबे: रेनिगुंटा, रझमपेट, कड्डुपा, येर्रगुंटला, ताडीपत्री, गुत्ती, गुंटकळ, धोन, कुर्नूल सिटी, गदवाल, महबूबनगर, जडचर्ला, काचीगुडा, मलकाजगिरी, मेडचल, कमारेड्डी, निजामाबाद, बासर, धर्माबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, नंदुरबार, उधना, वडोदरा, रतलाम, मन्दसौर, नीमच, चित्तौडगड, भीलवाडा, बिजैनगर, नसीराबाद, अजमेर, किशनगढ, फुलेरा जं, रिंगस जं, सीकर जं, नवालगढ, झुंझुनू, चिरावा, लोहारू आणि सादुलपूर.

संरचना -: 20 तृतीय श्रेणी वातानुकुलीत, 2 सामानवाहू व गार्ड ब्रेक व्हॅन्स एकूण 22 कोच.

अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in किंवा NTES अ‍ॅप डाउनलोड करा.