केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या समोरच एकनाथ शिंदे यांचा “जय गुजरात” चा नारा

पुणे, – एकीकडे राज्यात मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा पेटला असताना मराठी बोलण्यावरून मराठी भाषेच्या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक झाले असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या समोरच एका कार्यक्रमात ” जय गुजरात ” चा नारा दिला.

मराठी अस्मितेवरून वातावरण तापलं असतााना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या समोरच एका कार्यक्रमात “जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात ” चा नारा दिला. त्यामुळे राज्यात नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.