5 जुलै ते 15सप्टेंबर दरम्यान अहमदाबाद रेल्वे स्थानकावरील विकास कामांमुळे काही गाड्यांच्या मार्गात व स्थानकात तात्पुरते बदल

भुसावळ (प्रतिनिधी ) रेल्वे जास्त वेळ आहे असे काहीजमीन विकास प्राधिकरण (RLDA) मार्फत अहमदाबाद रेल्वे स्थानकाच्या जागतिक दर्जाच्या सुविधांमध्ये रूपांतर करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प सध्या प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पाअंतर्गत प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वर नवीन ओव्हर ब्रिज व कंकर्स बांधण्याचे काम प्रस्तावित असून, त्यासाठी आवश्यक पायाभरणी (Piling) व इतर बांधकाम कार्ये ५ जुलै २०२५ ते १२ सप्टेंबर २०२५ या कालावधीत पार पडणार आहेत.

या कामामुळे अहमदाबाद स्थानकावरून सुरू होणाऱ्या व समाप्त होणाऱ्या काही गाड्यांच्या मार्गात व टर्मिनलमध्ये तात्पुरते बदल करण्यात येत आहेत. प्रवाशांनी पुढीलप्रमाणे बदलाची नोंद घ्यावी:

अहमदाबादऐवजी असार्वा येथून गाड्या सुरू होणार
गाडी क्रमांक १२६५५ अहमदाबाद – चेन्नई सेंट्रल एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ०५.०७.२०२५ पासून अहमदाबादऐवजी असार्वा येथून २१.०५ वाजता सुटेल.
गाडी क्रमांक १२६५६ चेन्नई सेंट्रल- अहमदाबाद एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ०४.०७.२०२५ पासून अहमदाबादऐवजी असार्वा येथे १८.२० वाजता पोहचेल.

अहमदाबाद ऐवजी साबरमती जंक्शनवर थांबा
१) गाडी क्रमांक २२७३८ हिसार -सिकंदराबाद एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ०६.०७.२०२५ पासून साबरमती येथे आगमन वेळ ०७.१० वाजता आणि प्रस्थान ०७.२० वाजता.
२) गाडी क्रमांक २२६६४ जोधपूर -चेन्नई एग्मोर एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ०८.०७.२०२५ पासून साबरमती येथे आगमन वेळ ०७.१० वाजता आणि प्रस्थान ०७.२० वाजता.
३) गाडी क्रमांक २२७२४ श्री गंगानगर -हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ०५.०७.२०२५ पासून साबरमती येथे आगमन वेळ ०७.१० वाजता आणि प्रस्थान ०७.२० वाजता.

रेल्वे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी. हे ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. प्रवाशांना विनंती करण्यात आले आहे की, त्यामुळे होणारा गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे.